मुरूम, ता. उमरगा, दि. २२:


 गुंजोटी, ता. उमरगा येथील श्रीकृष्ण महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील प्रा. राजाराम निगडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या मानवविद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी रोजी  प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. 


त्यांनी ' स्वामी विवेकानंदांचे सामाजिक-शैक्षणिक विचार व सद्यस्थितीतील उपयुक्तता ' या विषयावर मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक तथा संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. महेश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दामोदर पतंगे, अध्यक्ष विभावरी शाईवाले, उपाध्यक्ष पी. एन. हिरवे, संचालक सागर पतंगे, प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. महेश मोटे, डॉ. जगदीश नन्नवरे, डॉ. किशन लोहार, डॉ. सुनील पतंगे, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. इब्राहिम इनामदार, बालाजी व्हनाजे, सहशिक्षक सुधाकर म्हेत्रे, योगेश पांचाळ आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.                   

 
 
Top