काटी ,दि.२१

हिंदू सणातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा दिपावली सण आला की लहान चिमुकल्यांना वेध लागतात सुट्या आणि रंग‌बेरंगी आकाश कंदिलांचे.


 विद्यार्थ्यांना शाळेतच आकाश कंदील बनविण्याचे प्र‌शिक्षण देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित, एकलव्य विद्या संकूलातील वर्गशिक्षिका सविता गोरे, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरीतील श्रेयस माने,समर्थ मराळ, चंचल पवार, अपूर्वा जाधव,समृद्धी कोल्हटकर,शौर्य मिटकर,संग्राम मरिआईवाले, अंबिका कडकंचे,भक्ती शिंदे, नैतिक गावडे, शंभर गानगोळे, अनिता कडकंचे, शंभू रणदिवे, प्रतीक्षा गायकवाड या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून  छोटे-छोटे आकाशकंदील साकारले. तिसरीतील या चिमुरड्यांनी बनवलेल्या आकाशदिव्यांचे कौतुक होत आहे.
 

दीपावलीला आवश्यक असणाऱ्या आकाशकंदिलाचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे  मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांनी सांगितले.
 
Top