मंगरूळ दि.२९
सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नावर वात्सल्य सामाजिक संस्था करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे असे मत दिवाणी न्यायाधीश श्री.मनोज नेपते यांनी व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील वात्सल्य सामाजिक संस्थेला त्यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी त्यांनी वात्सल्यच्या माध्यमातून सुरु असलेल्या विषयांची माहिती घेतली.डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाने वात्सल्यसाठी मदत पाठवली होती.याप्रसंगी या मदतीचे प्रातिनिधिक स्वरूपात काळेगाव येथील बेबाबाई घोडके या एकल भगिनीस भाऊबीजेची साडी-फराळ दिली गेली.
वात्सल्यने अनाथ व एकल भगिनींच्या 23 मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.लक्ष्मी मुळे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीस श्री.नेपते यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप केले.
याप्रसंगी विधी महाविद्यालयाचे प्रा.नितीन कुंभार,काळेगावचे सरपंच श्री.आनंदराव पाटील,वात्सल्यचे कार्यकर्ते श्री.अरविंद मुळे,श्री.नितीन सरवदे. श्री.दयानंद मुळे,श्री.अरविंद बनसोडे यांची उपस्थिती होती.