मुरुम, ता. उमरगा, दि. १२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत घेण्यात आलेल्या धावण्याच्या (क्रॉसकंट्री) स्पर्धेत श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील बी. ए. तृतीय वर्षात शिकणारी महिला खेळाडू कुमारी लक्ष्मी गुंजोटे हीने नुकत्याच बीड येथील बी. पी. एड. महाविद्यालयात आयोजित स्पर्धेत विद्यापीठातून बेस्ट ऑफ सिक्समध्ये निवड होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे.
तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्रा. डॉ. सतिश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. किरण राजपूत, डॉ. महेश मोटे, डॉ. शिला स्वामी, डॉ. रवि आळंगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. अविनाश मुळे, डॉ. विनायक रासुरे आदींनी तिचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. तीचा महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार घालून सत्कार मंगळवारी (ता. ११) रोजी करण्यात आला. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव व प्रा. नारायण सोलंकर यांनी तिला मार्गदर्शन केले.