सोलापूर ,दि . १०
खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तातडीने आमलबजावणी करण्याबाबत सोलापूर साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

    
सण, उत्सव, उन्हाळ्याची सुटी, दीपावली या कालावधीत खासगी प्रवासी टॅ्रव्हल्सकडून भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लुट चालू  असल्याचा आरोप करुन हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखली जावी, याविषयी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, तसेच परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. 


प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी  परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी याविषयी करावयाच्या कार्यवाहीचे निर्देश सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना निर्गमित केले उल्लेख करुन त्यानुसार येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशा प्रकारे दरवाढ करण्यात येऊ नये, याविषयी दक्षता घ्यावी, तसेच सोलापूर जिल्ह्यात याविषयी तत्परतेने कार्यवाही व्हावी, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने  दत्तात्रय पिसे यांनी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांना दिले. अमरसिंह गवारे यांनी या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 
 
निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या

१. खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बुंकिंग केंद्रे आणि गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम किती दर आकारता येईल ? याचा तक्ता दर्शनी भागात लावावा.
२. मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक द्यावा. खासगी ट्रॅव्हल्स आणि बुकींग केंद्रे या ठिकाणीही हा क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा.
३. नियमबाह्य तिकिटदर आकारून प्रवाशांची लुट करण्याविषयी प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यांतील किती जणांवर, कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली ? याचा तपशील मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या निवेदनावर 
सुराज्य अभियाचे (हिंदु जनजागृती समितीअंतर्गत) राजन बुणगे यांची स्वाक्षरी आहे.

 
Top