काटी ,दि.०१
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गणातील 70 आजी माजी सैनिकांचा सत्कार येथील सरस्वती मंगल कार्यालयात करण्यात आला.
निमित्त होते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता कुलकर्णी, भारत राऊत, निवृृत अग्निशमक अधिकारी दिलीप गुंड, स.पो नी. सचिन पंडित,अरुण गायकवाड यांची प्रमुख उपस्थित होते. हा कार्यक्रम तामलवाडी पंचायत समिती गणांचे सदस्य दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास सुधाकर लोंढे,मारुती पाटील,रशीद पटेल, प्रशांत राऊत,सुभाष लोंढे, सुभाष राऊत,जोतिबा कदम, स्वप्नील पाटील,अशोक नवगिरे, पांडुरंग मगर,धनाजी कदम, विष्णू शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमचे प्रस्ताविक संयोजक दत्ता शिंदे,सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे यांनी तर आभार नागनाथ मसुते यांनी मानले.