तुळजापूर, दि. ०४: उमाजी गायकवाड


सर्वाचे लक्ष वेधलेल्या  तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी समजली जाणाऱ्या तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळकृष्ण तांबारे, एल.बी.पडवळ,संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व  पॅनल प्रमुख धनाजी मुळे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या सत्ताधारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रणित, तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शिक्षक सेवा सहकार पॅनलने 
सर्व 11 जागांवर जवळपास 100 मतांच्या फरकाने विजय मिळवत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. 



तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे एकुण  463 सभासद असून 450 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल दहा कोटींपर्यंत गेली असून कर्ज मर्यादा दोन लाखांवरुन दहा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

येथील बाजार समितीमध्ये अतिशय अतितटीच्या व खेळीमेळीच्या वातावरणात  पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर सायंकाळी पाचनंतर  मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डि.जी.मोरे आणि सहायक निवडणूक अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना मतमोजणी प्रक्रिया समजावली आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली. या निवडणुकीत तीन पॅनल होते. त्यात शिक्षक सहकार पॅनलने  पुन्हा एकदा बाजी मारली. तर विरोधी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित, स्वाभिमानी शिक्षक पॅनल आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती प्रणित,शिक्षक सन्मान शिक्षक पॅनलला आपले खातेही उघडता आले नाही. 



मागील पाच वर्षाच्या कालखंडात विजयी शिक्षक सेवा सहकार पॅनलने चांगले काम केल्याने मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकून बहुमतांनी निवडून दिले. विजयी पॅनल मधून प्रशांत मिटकर, सुनिल सुर्यवंशी, विठ्ठल गायकवाड, दयानंद जवळगावकर,प्रशांत गायकवाड, सत्येश्वर जाधव, अशोक राठोड, नागेश स्वामी, सोमनाथ निटुरे, श्रीमती रेखा गोरे, श्रीमती सुनिता गाढवे हे शिलेदार विजयी झाले. 


निकालानंतर विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते यांनी मतदान केंद्रांबाहेर गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर सर्व विजयी शिलेदारांसह, पॅनल प्रमुख, शिक्षक मतदारांनी भवानी मार्गावर विजयी रॅली काढून आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. 

या विजयी आनंदोत्सवात
 राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, शिक्षकनेते एल.बी.पडवळ, राज्य उपाध्यक्ष अशोक जाधव,जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे,जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन मोहन जगदाळे, शेषेराव राठोड,सुनिल सुर्यवंशी, राहुल थोडसरे,  विद्यमान चेअरमन धनंजय मुळे,कळंब तालुका अध्यक्ष दत्तात्रय पवार, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ इटकरी, जिल्हा सोसायटीचे व्हॉइस चेअरमन अनिल हंगरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी माळी,शिक्षक नेते सचिन राऊत, माजी चेअरमन दयानंद जवळगावकर,बापू काळे, विजयकुमार गायकवाड, महादेव गायकवाड, वैभव देशमुख, हर्षवर्धन माळी,सोमनाथ जामगावकर,पंकज काटकर, उमेश भोसले, प्रशांत मिटकर, नितीन ढगे, सुरेश राऊत,सचिन राऊत यांच्यासह शिक्षक सेवा सहकार पॅनलचे सर्व विजयी उमेदवार,शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते,सभासद  सहभागी झाले होते.
 
Top