काटी, दि.२३: उमाजी गायकवाड

तुळजापूर खुर्द येथील बोरी नदीवरील मोर्डा रोडवरील पुलाचे काम  निकृष्ट निकृष्ट झालेबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर यांना निवेदन देऊन निवेदनात संबंधित गुत्तेदाराने इस्टेमेट प्रमाणे झाले नसून काम निकृष्ट झाल्याचे नमूद करून संबंधित गुत्तेदारावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.


सोमवार दि. 21 रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व ठेकेदाराबाबत संताप व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कामाच्या दर्जाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची व दुसरा पूल बांधून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच संपूर्ण पुल पुन्हा नव्याने बांधण्यात यावा,पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशा विविध मागण्या आंदोलना दरम्यान निवेदनात करण्यात आल्या आहेत.
 

पूल संपूर्णपणे नवीन बांधण्यात यावा आणि पुलाची हाईट वाढवण्यात यावी ही मागणी केली आहे. तहसील आणि बांधकाम विभागाचे प्रतिनिधी घोडके व विभुते आंदोलकांचे मत जाणून घेऊन मागणीचे निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन पुढील तीन महिन्यात नव्याने पुल बांधून संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.


यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब कापसेळ, प्रदेश सचिव चंद्रकांत गायकवाड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष आनंद भालेराव, उपाध्यक्ष नेताजी शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष रवी पवार, फुलचंद गायकवाड, पंचाक्षरी चव्हाण, इसाक शेख, तालुका अध्यक्ष गणेश पाटील,शहराध्यक्ष निखिल आप्पा अमृतराव, तालुका संघटक बालाजी जाधव, तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब पाटील, नेताजी शिंदे, तालुका कार्याध्यक्ष त्रिशूल मुळे, बांधकाम विभाग अध्यक्ष श्रीकांत करंडे, दत्तू वाघमारे,दयानंद गड्डे, सचिदानंद हरताळे, भागवत बरगंडे, दिलीप देवघर, सागर कोरे, पंडित जळकुटे, शिवराज जगदाळे, भोजने सर, यांच्यासह  भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top