उमरगा, दि. २३ लक्ष्मण पवार
उमरगा शहराजवळील लातूर रोड वरील बिरूदेव मंदिर देवस्थान येथे सातव्या अन्नछत्र वर्धापनदिनानिमित्त आकरा हजार दिवे लावून दिपोत्सव कार्यक्रम उत्साही वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 22 रोजी सायंकाळी 7:30 वा संपन्न झाला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यापारी महासंघाचे सिद्रामप्पा चिंचोळे, अंकुश शिंदे, श्री. चौगुले, जकेकूर चे सरपंच अनिल बिराजदार, दुशांत दंडगे, संतोष पटणे, श्रीशैल्य लिंबाळे, लक्ष्मण पवार, नगरसेवक गोविंद घोडके, पप्पू सगर, सचिन शिंदे, विनोद कोराळे, दत्ता शिंदे, नितीन कोराळे, जालिंदर सोनटक्के, बालाजी घोडके,पुणे येथील सौ. संगीता घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र बिरूदेव मंदिर देवस्थान कमीटी च्या वतीने मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पोटभरून जेवन दिले जात आहे. याला सहा वर्षे संपले असुन सातवा वर्धापनदिन सोहळा तब्बल आकरा हजार दिप लावून मंदिरात रोषणाई करून दिपोत्सव व विशेष महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो भाविक भक्तांनी उपस्थित राहून दिपोत्सव व महाप्रसादाचा लाभ घेतला.