नळदुर्ग, दि..२२ :
येथील भुईकोट किल्ल्यात १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह सुरू असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वारसा सप्ताह निमित्त युनिटी मल्टिकाॕन्सचे मुख्य संचालक कफील मौलवी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य पत्रकारांनी किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविले.
यावेळी ज्येष्ठ पञकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, प्रा. पांडुरंग पोळे, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, संतोष पुदाले, भगवंत सुरवसे, अमर भाळे, शोएब काझी, नेताजी महाबोले, आदीनी स्वच्छता आभियानात सहभाग घेतला.
जनसंपर्क आधिकारी विनायक अहंकारी यांनी जागतिक वारसा सप्ताह आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला. प्रा. पांडुरंग पोळे व तानाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीचे किल्ला व्यवस्थापक जुबेर काझी, युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी, हाजी शेख, अमिर फुलारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र पुरातत्व विभागाने 19 /11/2022 ते 25/11/2022 या दरम्यान जागतिक वारसा स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे..त्या नुसार नळदुर्ग किल्यात युनिटी मल्टीकॉन्स कंपनी च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. त्यानुसार किल्यात दररोज स्वच्छता अभियान केला जातो..
काल दिनांक 21/11/2022 रोजी नळदुर्ग शहरातील जि.प.प्रशाला मुलांची शाळा व जि.प्र.प्रशाळा मुलींची शाळा यांच्या मार्फत विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते.. लहान मुलांना आपल्या ऐतिहासिक वारसाची जाणीव करून दिली..