काटी, दि.२१:उमाजी गायकवाड
दि.२० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान भोपाळ, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ६५ व्या नॅशनल शूटींग स्पोर्ट्स स्पर्धेसाठी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तुळजापूर तालुक्यातील काटी सज्जाचे तलाठी प्रशांत प्रभाकर गुळवे यांची निवड झाली आहे.
यापूर्वी मुंबई येथे झालेल्या ९ व्या वेस्ट झोन पिस्तूल शूटिंग स्पर्धा,२०२२ मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची नॅशनल रायफल असोसिएशन, दिल्ली यांनी ही निवड केली आहे. मागील महिन्यात तिरुअनंतपुरम, केरळ येथे झालेल्या ऑल इंडिया मावलनकर शूटींग स्पर्धेत गुळवे यांनी सहभाग घेतला होता.
प्रशांत गुळवे हे सध्या काटी ता. तुळजापूर येथे तलाठी या पदावर कार्यरत आहेत .त्यांना हेमंत जाधव सातारा, व प्रमोद माळी, बार्शी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निवडीबद्दल काटी ग्रामस्थासह तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी अभिनंदन केले.