मुरूम, ता. उमरगा, दि. २६  : 

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, उस्मानाबाद व राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २६) रोजी ७३ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. 



प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी २६ /११ हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. शुभांगी कुलकर्णी, अंबिका पाताळे, निकिता पाताळे, योगेश पांचाळ, अमोल कटके यांनी सामुहिक संविधानाच्या उद्येशपत्रिकेचे वाचन केले. यावेळी महाअंनिसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी संविधानाचे महत्त्व याविषयावार मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुजाता मुके यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे तर आभार प्रा. डॉ. विनायक रासुरे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. दिनकर बिराजदार, प्रा. राजकुमार रोहीकर, भालचंद्र टाचले, नानासाहेब बेंडकाळे, प्रभाकर महिंद्रकर, चंद्रकांत पुजारी, लालअहमद जेवळे, दिलीप घाटे, महेश लिमये आदींची उपस्थिती होती.             


फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात  संविधान दिन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य अशोक सपाटे, डॉ. महेश मोटे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. नागनाथ बनसोडे व अन्य.
 
Top