नळदुर्ग,दि.२८
तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील सहशिक्षक तथा पत्रकार भैरवनाथ खंडू कानडे यांना ७३ व्या राष्ट्रीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ .बी आर .आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला .
दिल्ली येथील डॉ . विशाखा स्मृती सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ,अखिल भारतीय सिद्धार्थ कल्याण केंद्र , नवी दिल्ली , परिवर्तन सामाजिक प्रतिष्ठान अंधेरी ,तेजराजजी जोहरलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट बारामती , निफा फाउंडेशन , झारखंड आदी संस्थांच्या वतीने (दि.२६ )रोजी बारामती येथे संविधान दिनाच्या निमित्ताने 'भारतातील सामाजिक समानता ' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . या परिषदेत शैक्षणिक ,सामाजिक ,साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांना नवी दिल्ली येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडचे मॅनेंजर सुरज सिंग , बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. माधव जोशी ,अखिल भारतीय खाटीक समाज संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण गालींदे ,प्रा . गोरख साठे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला .याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .