मुरुम, ता. उमरगा, ता. १० :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठात नुकत्याच आयोजित झालेल्या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धत श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विद्यापीठातून . घवघवीत यश संपादन केले.
कुमारी सोनाली पवार-भालाफेक (प्रथम) तर
कुमारी लक्ष्मी गुंजोटे-१०००० मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते गुरुवारी (ता.९) रोजी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सतिश शेळके, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. अरविंद बिराजदार, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. अशोक बावगे, डॉ. संजय गुरव, डॉ. संध्या डांगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, राजू ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव व प्रा. नारायण सोलंकर यांनी मार्गदर्शन केले.