नळदुर्ग, दि.११:
नॅक ही एक निरंतर प्रकिया असून त्या अंतर्गत महाविद्यालयाने विद्यार्थीकेद्रीत गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, डाॅ.राधाकृष्णन, माजी कुलगुरू
नळदुर्ग शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे नॅक मूल्यांकन समितीने दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी भेट देऊन माहिती जाणुन घेतली. यामध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन माजी कुलगुरू केरळ विद्यापीठ तिरुअनंतपुरम, डॉ. रंगप्पा सदस्य समन्वयक दावणगिरी आणि प्राचार्य सुनील गोयल, शासकीय महाविद्यालय इंदौर यांचा समावेश होता. सर्वप्रथम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता कक्षात डॉ. मनोज झाडे यांनी महाविद्यालयातील विविध समित्या व विभागाची माहिती दिली.
नॅक मूल्यांकन समितीच्या वतीने महाविद्यालयाची पाहणी करताना महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभाग,ग्रंथालय , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन सी सी विभाग , प्रशासकीय कार्यालय , क्रीडा विभागाला समितीने भेट देऊन पाहणी केली दुपारच्या सत्रात समितीने पालक, माजी विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नॅक समिती समोर महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
दुसऱ्या दिवशी समितीने महाविद्यालयातील विविध संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिला कक्ष आणि दत्तक गाव रामतीर्थ तांडा येथे भेट दिली. शेवटच्या सत्रात समितीने आपला अहवाल एक्झिट मीटिंगमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,नॅक ही एक निरंतर प्रक्रिया असून त्याअंतर्गत महाविद्यालयातील गुणवत्ता पूर्ण उपक्रम राबवावे असे आवाहन केले. एक्झिट मीटिंगसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कोरेकर, समन्वयक डाॅ.मनोज झाडे, डॉ. आर के ढोकळे, डॉ.सावत, अधीक्षक धनंजय पाटील व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे नॅक कोअर्डिनेटर डॉ. मनोज झाडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.