नळदुर्ग ,दि. १३
उस्मानाबाद जिल्हाचे नूतन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची नळदुर्ग येथिल भुईकोट किल्यास भेट देवुन पर्यटकासाठी युनिटी कंपनीने केलेल्या शोभिकरणाच्या कामाची पाहणी करुन किल्ल्याची ऐतिहासिक माहिती जाणुन घेतली.
उस्मानाबाद जिल्याचे नूतन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी महाराष्ट्रात रोल मँडेल ठरलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्यास भेट दिली..यावेळी त्यानी संपूर्ण किल्ल्याची सविस्तरपणे पाहणी केली..
यावेळी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने किल्यात केलेल्या अमुलाग्र बदलाचे कौतुक केले.. यावेळी त्यांच्यासमवेत उस्मानाबाद जिल्हाचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी गुप्ता , तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे आदी उपस्थित होते.. जिल्हातले सर्व मोठे अधिकारी आज नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले होते...
यावेळी युनिटी कंपनीच्या वतीने माजी नगरध्यक्ष शहबाज काझी यांनी मान्यवरांचे स्वागत केले..
कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी , जनसंपर्क आधिकारी विनायक अहंकारी यांनी मान्यवरांचा पाहुणचार केला..