नळदुर्ग, दि.१६ : प्रा. दिपक जगदाळे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,नळदुर्ग येथे नॅक मूल्यांकन समितीने दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली. या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभाग, ग्रंथालय , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन सी सी विभाग , प्रशासकीय कार्यालय , क्रीडा विभागाला समितीने भेट देऊन पाहणी केल्यानंतर आपला अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. तोच अहवाल समितीने बंगलोर स्थित नॅकला सादर केला होता.
याच अहवालानुसार नॅक ने महाविद्यालयास B++ दर्जा बहाल केल्याचे कळविले आहे. महाविद्यालयास हा दर्जा पुढील पाच वर्षांकरिता असून या आधारे महाविद्यालयास विद्यार्थ्यी केंद्रीत विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध योजनांचा लाभ घेता येईल. समितीच्या अहवालामध्ये महाविद्यालयाने पुढील पाच वर्षांत विविध उपक्रमाबद्दल सूचना केल्या आहेत. समितीची भेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व घटकांनी योगदान दिले.
नॅक समितीने महाविद्यालयास B ++ दर्जा बहाल केल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,कार्याध्यक्ष माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , सचिव उल्हास बोरगावकर , उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर , संचालक बाबुराव चव्हाण , कार्याध्यक्ष रामचंद्र आलूरे ,सहसचीव प्रकाशराव चौघुले , .शहबाज काझी , लिंबराज कोरेकर , अशोकराव पुदाले , कोषाध्यक्ष.प्रदिप मंटगे आदीनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर , नॅक समन्वयक डॉ . मनोज झाडे ,उपप्राचार्य डॉ.रामदास ढोकळे यांचे अभिनंदन केले आहे.