नळदुर्ग ,दि. १७ :

नळदुर्ग शहरात गुरुवारी  हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब ठाकरे चौक येथे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामदास ढोकळे व प्रा.पांडुरंग पोळे यांच्या हस्ते तर लालबहादूर शास्त्री चौकामध्ये माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर  चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली.


 यावेळी उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपशहर प्रमुख श्याम कनकधर,   पत्रकार विलासजी येडगे,  तानाजी जाधव,  अमर भाळे, सुरज साळुंखे, युवा सेनेचे रवी पिस्के, ग्राहक कक्षाचे नेताजी महाबोले , संजय दुधभाते, भीमा कोळी, ज्ञानेश्वर कदम, पोपट कदम,  भिमाशंकर बताले आदी शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top