तुळजापूर , दि. १८ : उमाजी गायकवाड
महाराष्ट्र प्रदेशात नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानात कडवं हिंदुत्व जपणारे आणि जय भवानी जय शिवाजी हा जयघोष देशभर पोंचवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतीदिना निमित्ताने तुळजापूर येथील क्रांती चौक येथे शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे - पवार,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील,तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, महिला आघाडी शहर प्रमुख शोभा शिंदे,माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार,युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी,उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे,बापूसाहेब नाईकवाडी,युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे,कालिदास नाईकवाडी, अर्जुन साळुंखे, विनोद बनसोडे, महेश लबडे, अक्षय नाईकवाडी,बळीराम जगताप,उपतालुका प्रमुख सुनील जाधव,उपशहर प्रमुख दिनेश रसाळ,विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विकास भोसले,प्रदीप इंगळे, लालासाहेब देवकर,आंबेशर देशमुख,प्रसाद उंडरे, रितेश चव्हाण,काँग्रेसचे ऋषिकेश मगर, राष्ट्रवादीचे महेश चोपदार, गोरक्षनाथ पवार,शंकर शिंदे, अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.