पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक
नळदुर्ग, दि.०९ :
सुट्टी व मादी धबधबा वाहत असल्यामुळे नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात सुट्टीच्या कालावधीत पर्यटकांचा ओघ वाढल्याचे चिञ पहायला मिळाले.
दिवाळीच्या सुट्टीकाळात ३५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी भुईकोट किल्ला पाहण्याचा आनंद घेतला. सोलापूरच्या युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने किल्ल्यात केलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे पर्यटक आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत. लातुर, सोलापूरसह शेजारील जिल्ह्यातुन असंख्य पर्यटक किल्ल्यास भेट देत आहेत. सध्या किल्ल्यातील मादी धबधबा सुरू आहे.
किल्ल्यात केलेले सुशोभिकरण, राष्ट्रीय महामार्गावर भुईकोट किल्ला असल्यामुळे तसेच किल्ल्यात बोटींग, घोडे सवारी , विविध फुलझाडे , बगीचा , शुध्द पिण्याचे पाणी आदी सुविधासह भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला असूनही आत फिरण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन असल्याने वयोवृद्ध, दिव्यांग यांनाही किल्ला पाहणे सोयीचे झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ नळदुर्ग किल्ल्याकडे वाढत आहे.
पावसाळ्यात किल्ल्याच्या तटबंदीवर वाढलेली झाडेझुडपे काढताना युनिटी मल्टिकाॕन्सचे कर्मचारी
मागील चार पाच महिन्यात पावसामुळे भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर व बुरूजावर मोठ्या प्रमाणात गवत,झाडे झुडपे वाढली असून युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीकडून सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन तटबंदीवरील झाडे झुडपे काढण्याचे काम सुरू आहे. विस्तीर्ण तटबंदी पाहता हे काम मोठे जिकीरीचे व वेळखाऊ असल्याचे दिसत आहे.
नळदुर्ग किल्ला पर्यटनामुळे स्थानिक शेकडो बेरोजगाराना रोजगार मिळाला आहे. तुळजापूर ,अक्कलकोट व गाणगापूर येथे येणा-या भाविकासाठी किल्ल्याच्या शेजारी राहण्याची व विवाह समारंभ ,साखरपुडासह विविध कार्यक्रम घेण्याची सोय युनीवर्डस याठिकाणी उपलब्ध आहे.