नळदुर्ग, दि. ०८ : प्रा दिपक जगदाळे
नळदुर्ग शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवार दि. ९ व गुरुवार दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय मूल्यांकन व दर्जा निर्धारण परीषद (NAAC ) ची तज्ञ समिती तिसऱ्या फेरीच्या मूल्यांकनासाठी भेट देत आहे .
या भेटी दरम्यान सदर समिती मागील पाच वर्षाच्या विविध शैक्षणिक व सह शैक्षणिक उपक्रमांची व महाविद्यालयाशी संबंधित सर्व बाबींची तपासणी करणार असून महाविद्यालयाच्या मुख्य घटकांशी विद्यार्थी , पालक , माजी विद्यार्थी , संस्था चालक व शिक्षक यांच्याशी संवाद साधून त्यांचे महाविद्यालयाच्या वाटचालीत योगदान व संभाव्य सूचनांची नोंद घेणार आहे . हा संवाद महाविद्यालयाचा दर्जा निर्धारणात मोलाची भूमिका बजावणार असून यासाठी बुधवार रोजी विद्यार्थी , माजी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संजय कोरेकर व नॅक समन्वयक डॉ . मनोज झाडे यांनी केले आहे .