नळदुर्ग दि.२९ : 

नळदुर्ग महसुल मंडळार्गत १९गावातील जुने आभिलेख तपासुन  इनामी ,कूळ सिलिंग व  वक्फ बोर्डाच्या तब्बल १ हजार १३० एकर क्षेञ भोगवटादार वर्ग २ अशी नोंद घेण्यात आली आहे.यामुळे नळदुर्ग  शहरसह परिसरातील शेतक-याच्या चिंतेत भर पडली आहे.   


काही दिवसापुर्वी अतीवृष्टीने शेतातील पिक वाया गेले.विमा कंपनीकडून पिकविमा देण्यास झालेली टाळाटाळ आणि आता भोगवटदार वर्ग २ अशी झालेली नोंद यामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढले आहे. आशावेळी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने याप्रकरणी शेतकरी हिताचा निर्णय  घेवुन दिलासा दयावा,अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.



नळदुर्ग  व शिवारातील असंख्य जमिनीची भोगवटदार वर्ग २ अशी नोंद झाल्याने शेतकरी व प्लाॕट धारकामध्ये मोठी खळबळ उडाली असून आज घडीला ११५ गटातील  १हजार१३० एकर  क्षेत्रावर भोगवटदार वर्ग २ असा उल्लेख करण्यात आला आहे.

 यामध्ये वक्फ बोर्ड राजपञ व जुना गाव नमूना ९, सिलिंग वाटप रजिस्टर नक्कल प्रमाणे ३६ ई कुळ रजिस्टर नक्कल प्रमाणे सात बारावर भोगवटदार  वर्ग २ प्रमाणे नोंद घेण्यासाठी तत्कालीन उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नळदुर्ग सज्जा तलाठी यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी नोंद घेतल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी यास मंजुरी दिली आहे.नळदुर्ग मंडळ अंतर्गत १९ गावात सर्वे करण्यात आला.या गटातील इनामी ,कुळ, सिलिंग व वक्फ बोर्डच्या अंतर्गत यामध्ये ३७५ संबंधित शेतकरी व प्लाॕटधारकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीस मध्ये संबधितांनी उपस्थित राहून म्हणणे दाखल करावे अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून सदरचा फेरफार रद्द करून सदरील जमिन शासन जमा करण्यासाठी संबधिताकडे प्रस्तावित करण्यात येईल असा उल्लेख आहे. 



या नोटीस नंतर ७५ शेतक-यानी नळदुर्ग तलाठी कार्यालयात दि. २६ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव दाखल केले आहेत.
भोगवटदार वर्ग २ अशी नोंद झालेल्यामध्ये शहरातील शासकीय विश्रामग्रह परिसर, शहरालगतच्या अक्कलकोट रोडवरील गणेशखीळा, कळवातणीचे शेत, कंदुरमळा, पाटील तांडा, जखणीतांडा, इंदिरानगर जवळील भाग, बोरीधरण लगत, मैलारपूर जवळील गव्हाणे पट्टा, भुईकोट किल्ला लगत दक्षिण भाग याचा समावेश आहे. 

शासनाकडून भोगवटदार वर्ग २, इनामी, वक्फ जमिनी, सिलींग कायद्यातील जमिनींचा मूळ प्रयोजनांसाठी वापर होतोय की नाही, हे तपासले जात आहे. शिवाय चुकीच्या पध्दतीने झालेले फेरफार रद्द करून संबंधितांवर कारवायाही केल्या जाणार आहेत. नळदुर्ग मंडळात अशा शेकडो एकर जमिनींच्या सातबारांवर आता भोगवटदार क्रमांक २, असा उल्लेख आल्याने प्लॉट खरेदी करून घरे उभारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ज्या जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण, विक्री झाली आहे,अशा जमिनी मूळ मालकांमार्फत रूपांतरण शुल्क भरून नियमित करता येऊ शकतात. भोगवटदार क्रमांक २ च्या जमिनी म्हणजे इनामी  जमिनी, वक्फच्या जमिनी,वन, गायरान, कूळाच्या तसेच वतनाच्या जमिनी असतात. भोगवटदार क्रमांक दोनच्या जमिनी विकण्याचा अधिकार संबंधित शेतकऱ्याला नसतो. इनामी किंवा वक्फच्या जमिनी या संबंधित मंदिर किंवा मशिदच्या सेवेसाठी दिलेल्या असतात. तर अन्य जमिनी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी असतात. मात्र,वतनाच्या किंवा इतर जमिनींची विक्री करता येते. त्यासाठी शासनाची अर्थात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. काही प्रमाणात रूपांतरण शुल्क किंवा नजराणा रक्कम भरावी लागते.      

नळदुर्ग शहर व परिसरात या गटांतील शेतकऱ्यांचा भोगवटदार वर्ग २ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
१४९/१,१४९/१/२, १४९/२, १५०/१, १५३,१५४,१५५, १५६, १५६/२, २७६/अ/१, २७९, ४३,४४, ४५, ४७, ४८, ५१/अ, ५१/क/२ ५१/ब,  ५२/अ/१, ५२/अ/२, ५२/क, ५२/ड, ५२/ब, ७३/अ, ७३/क, ७३/क/२, ७३/फ/१, ७३/फ/२, ७३/ब, १५०/२, १५२/१, १५२/२, २९६/१, २९६/२, २९६/३, २९६/४, १०१/१, १०१/२, १०७/२, १११/१, १११/२, ११२/१, ११२/२, ११४, ११५/१, ११५/२, ११५/३, १४०/१, १४०/२, १४०/३, १४१, १४१/२, १४१/३, १४२/१, १४८, १६७/१, १६७/२, १६७/३, १६७/४, १६७/५, १७६/४, १९०/१, १९०/२, १९०/३, २०४/अ/३, २१/१, २१/२, २१/अ/३, २१/४, २१/५, २२/१, २२/२, २२/३, २३/१, २३/२, २३/३, २३१/ब/३, ३२४/३, २३९/१, २३९/२, २३९/५, २३९/७, २३९/८, २४/१, २४/२, २४०/२, २४०/३, २५/१, २५/२, २५/३, २५/४, ६२, ६३, ६५, ८२/१, ८२/२, ८५/१, ८५/२, ८५/३ ईत्यादी.
 
Top