काटी/उमाजी गायकवाड
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथे दसरा चौकातील शाहू स्मारकामध्ये सोमवार दि.28 नोव्हेंबर रोजी कवी संमेलन भरविण्यात आले होते. या कवी संमेलनाचे उद्घघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.अलका नाईक अभिनेत्री पुजा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कवी दलित मित्र नंदु बनसोडे यांनी सध्या देशाला मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. शालेय वयातच अनेकजण व्यसनांना बळी पडत आहेत. व्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट बनत आहे.अशा बिघडत्या परिस्थितीत तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी व व्यसनाधीन तरुणाईला सावरण्यासाठी कवी बनसोडे यांनी "व्यसनमुक्ती" या विषयावर आपली बहारदार व दर्जेदार कविता सादर करुन व्यसनमुक्ती कार्यात सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय "व्यसनमुक्ती" प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी प्रा. डॉ. अलका नाईक, अभिनेत्री पुजा पवार-साळुंके, प्रमुख पाहुणे अमोल मडापे, आयोजक सुरेश संकटे यांच्यासह
विविध ठिकाणचे जेष्ठ, बाल कवी उपस्थित होते.