काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. 7 रोजी सायंकाळी येथील दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून दत्तजयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली.
दत्त जन्मोत्सवनिमित्त मंदिरात फुले व रोषणाई करून दिवसभर ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा गजर सुरू होता. मागील वर्षी येथील भक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन मंदीरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी कायम स्वरुपी स्पिकरसेट खरेदी केला होता.
जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मंदिरात आकर्षक फुलांच्या सजावटीने पाळणा बांधून अनेक भाविकांच्या उपस्थितीत वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांनी दिगंबरा, दिगंबरा,श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात संध्याकाळी सहा वाजता पुष्पवृष्टी वाहून दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी हभप सुनिल महाराज ढगे यांच्या किर्तन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दत्त जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी गाटे गल्ली, माळी गल्ली भजनी मंडळासह येथील भाविकांनी परिश्रम घेतले.