तुळजापूर, दि . ०७

    लोटस पब्लिक स्कुल चा विद्यार्थी प्रथमेश अमृतराव याने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस आणि लॉन टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करत विभागीय फेरीत धडक मारली आहे. प्रथमेश अमृतराव याने जिल्हास्तरीय लाॅन टेनिस स्पर्धेत द्वितय क्रमांक तर जिल्हा स्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथमेश अमृतराव चे या यशाबद्दल कौतुक होत आहे.  

     
प्रथमेश अमृतराव च्या या यशाबद्दल लोटस पब्लिक स्कुल चा वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक धनंजय शहापुरे,  कोषाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे यांचा सह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमेश अमृतराव ला प्रशिक्षक संजय नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 
 
Top