उमरगा : लक्ष्मण पवार
विश्वाला तारण्यासाठी गुरू ची सेवा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अचलबेट देवस्थान चे हभप. हरी गुरूजी लवटे महाराज यांनी केले.
ते अचलबेट देवस्थान येथे दत्त जयंती निमित्त आयोजित प्रवचन सेवेत बोलत होते. यावेळी बसवकल्याण चे आमदार शरणू सलगर, मगर बिराजदार, बाळासाहेब जांभळदारे, विठ्ठल दामोदरे, पंडित मुळे, तुकाराम माने, ज्ञानेश्वर बरमदे, ज्ञानेश्वर येवते, हभप. दिपक महाराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हभप. हरी गुरूजी म्हणाले की, गुरू चा जयजयकार करण्यासाठी परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करावे, ब्रम्हा, विष्णू, महेश यांना गुरू समान पध्दतीने पहावे, गुरू शी एकनिष्ठ रहावे, ज्ञानेश्वर,तुकाराम,एकनाथ महाराज या संतांनी गुरू चे महत्व सांगितले आहे. कोण कोणासोबत आहे हीच संगत भविष्य ठरवते. वैचारिक पातळी ठरते. गुरू गुरू साधनेत असताना गुरूशी लिन व्हायला पाहिजे असे म्हणाले.
शेवटी बोलताना म्हणाले की, उज्वलानंद बाबा गुरूस्थानी आहेत. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो या ओवी प्रमाणे सदगुरू नाथ उदार असतात, गुरू शिष्याला उदार अंतःकरणाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. गुरू उदार असतात म्हणून गुरूचा साक्षात्कार होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. यावेळी दत्त जयंती निमित्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा जयघोष करीत गुलालाची उधळण करून संपन्न करण्यात आले. यावेळी अचलबेट देवस्थान चे सर्व भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.