नळदुर्ग,दि. १०
एस.बी.आय.फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयाने समाजिक दायित्व निधीतून तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, येडोळा, जकनी तांडा, गायरान तांडा या पाच गावामध्ये ग्रामसेवा कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून चालू आहे.
याअंतर्गत गावामध्ये शाळा संगणिकीकरण , पाणी शुद्धीकरण केंद्र, विद्युतीकरण, महिला सक्षमीकरण, उपजीविका विकास, स्वच्छता, बायोगॅस आदी विकास कामे झाली आहेत. या कामाची एस.बी.आय फाउंडेशन मुंबईचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल काठेवाड यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले.
यावेळी दिलासाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अंतरयामी करजे, समन्व्यक विलास राठोड, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड, गुरुदेव राठोड , भूषण पवार, श्रीमंत राठोड,अमित लोंढे, जि.प.शाळेचे शिक्षक स्टाफ शेख आय.एम, पवार एस.एस, राठोड एस.एम., कांबळे, महाबोले, प्रतिभा स्वामी, शिंदे एल.एस, गाडवे.एस.एम, अजित राठोड, सीताराम चव्हाण, मनोज चव्हाण, महिला बचत गटाच्या निर्मला राठोड, कांता राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.