मुरूम, ता. उमरगा, दि.१५
येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते बुधवारी
डॉ. संजय कांबळे व डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सत्कार करण्यात आले.
दि. १४ रोजी नुकत्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीत बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे यांची अधिसभा (सिनेट) सदस्य पदी निवडून आल्याबद्दल व प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांची बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन अँड मर्कंटाईल लॉ या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. शौकत पटेल उपस्थित होते.