नळदुर्ग ,दि.१६: विलास येडगे
बार्शी तालुक्यातील हळदुगे येथील रहिवासी व नळदुर्ग येथील शहाजी येडगे यांचे जावई दत्तात्रय देवकते यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाल्याबद्दल दि.१३ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे शहर पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन अमर भाळे यांनी केले होते. दत्तात्रय देवकते यांच्या घरची परिस्थिती अतीशय हालाकीची आहे. वडील दुसऱ्यांची शेती करून त्यांनी आपल्या मुलाला शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. दत्तात्रय देवकते यांनीही अतीशय मेहनत घेऊन अभ्यास केला. सुरुवातीला त्यांनी मुंबई पोलिस म्हणुन पोलिस सेवेत भर्ती झाले. पाच वर्षे मुंबई पोलिस म्हणुन नोकरी केल्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या कालावधीत त्यांनी प्रचंड मेहनत व अभ्यास केला. आणि त्यात त्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाली आहे. ते दि.१३ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे आल्यानंतर त्यांचा नळदुर्ग शहर पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा मित्र परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम येथील हरी--सुंदर कॉम्प्लेक्स येथे पार पडला.
प्रारंभी अमर भाळे,पत्रकार उत्तम बनजगोळे व माजी नगरसेवक सुधीर हजारे यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मारुती खारवे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,पत्रकार तानाजी जाधव,शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, विलास येडगे,शहाजी येडगे, गणेश येडगे, रोहीत येडगे, अमित येडगे, कृष्णा लवटे, राघव येडगे आदीजन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार तानाजी जाधव यांनी मानले.