नळदुर्ग, दि.१८ :

 शहरातील पाटबंधारेच्या जलसिंचन शाखेत,शाखाधिकारीसह अनेक कर्मचाऱ्यांचे रिक्त पद असल्याने शेतकऱ्यांना कामासाठी अनेक महिन्यापासुन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.  प्रशासनातील वरिष्ठ आधिका-यांच्या उदासिन धोरणाचा शेतकऱ्यांना नाहकच फटका सहन करावा लागत असुन शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरिता  महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे.


नळदुर्ग शहरातील जलसिंचन शाखा क्र-२६,२७,२८,२९ असे एकूण चार शाखा आसुन एका शाखेसाठी शाखाधिकारी-१,दप्तर कारकुन-२,कालवा,निरीक्षक-४,मोजनीदर-४,कालवा चौकीदार -४,कार्यालय, चौकीदार -४,शिपाई- १,कालवा टपाली-१,मजूर असे  एका शाखेत एकूण २२कर्मचा-यांचा स्टाफ असून ४ शाख़ेंचे मिळून ८४ कर्मचारी असायला हवेत,परंतु सद्या या जलसिंचन शाखेचा कारभार रामभरोसे असून या चार शाखेचे मिळून केवळ २ कर्मचारी आहेत,तर सब डीव्हिजनला दप्तर कारकुन -४,सहा. अभियंता, शिपाई -२,चौकीदार -२,ड्रायव्हर-१,असा कर्मचारी वर्ग असून पण सद्य स्थितीत दप्तर कारकुन-१,सहाय्यक अभियंता -१,ड्रायव्हर-१,शिपाई-१,असा कर्मचारी वर्ग असल्याने काम करत असताना त्या कर्मचा-यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.


 कारण जलसिंचन शाखा क्र-२७ मध्ये कुरनुर ,व इतर-२,क्र-२८ मध्ये खंडाळा मध्यम प्रकल्प व इतर १०(छोटे तलाव) ,क्र-२६-१०,क्र -२९-१०, असा  मोठा विस्तार असताना,केवळ २ कर्मचारी हा कार्यभार सांभाळत आहेत.


कोणत्याही शाखेत शाखाधिकारी व इतर कर्मचारी नसल्याने शेतकऱ्याचे तर नुकसान होतच आहे,कारण गेल्या सहा महिन्यापासून पाणी परवाना मिळत नाही,शेतकरी फक्त हेलपाटे मारण्याचे काम करीत आहेत.त्यामुळे शेतक-यांचा वेळ जात असून नाहक त्रास होत आहे, शिवाय शाखाधिकारी व इतर कर्मचारी नसल्याने कार्यालयीन कामकाजावर सुद्धा मोठा परिणाम होत आहे.पाहणी,ड्रॉइंग,अंदाज पत्रक,पाणी परवाना,सिंचन व्यवस्थापन,कार्यालयीन कामकाज,कर वसूली,बँकेत भरना,अशा जबाबदारी बरोबरच पाणी परवाना मिळवण्यासाठी सहा महिन्यात जवळपास ७५ शेतकऱ्याचे अर्ज धूळ खात पडले आहेत. कर्मचारी  नसल्याने जवळपास ५० लाख वार्षिक करवसूली होणारी ती केवळ २ कर्मचा-यांमुळे १८-२० लाख एवढीच होत आहे,याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र-२ उमरगा कार्यकारी अभियंता व धाराशिव जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करुन हे सर्व निदर्शनास आणून दिले आहे,शिवाय शाखाधिकारी सह इतर  आवश्यक कर्मचारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनावर मनसेचे  जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.तसेच येत्या महीना अखेर पर्यंत ज्या शेतकऱ्याचे पाणी परवान्यासाठी अर्ज आले आहेत,त्यांना तात्काळ पाणी परवाने देण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाइलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेने संबंधित विभागाला दिला आहे.
 
Top