तुळजापूर ,दि. १९ :

धनराज टि व्ही न्युज चँनेलचे संपादक श्री रवीचंद्र शिवाजी गायकवाड वय ३२, राहणार किलज ता.तुळजापूर  यांचा आपघात रविवारी राञी ८ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील  सलगरा परिसरात दुचाकीचा आपघात होवुन गंभीर जखमी झाले . त्याना उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात  दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा आज  सोमवारी  सकाळी ८ वाजता  निधन झाल्याचे पञकार  दादासाहेब बनसोडे यानी सांगितले .

रविचंद्र गायकवाड यांच्या  पश्चात आई , वडिल,पत्नी असा परिवार आहे.
गेल्या दहा वर्षापासुन तुळजापूर येथे धनराज टि व्ही न्युज चँनेलचे संपादक म्हणुन गायकवाड हे काम करीत असताना त्यानी  अनेक विषय हाताळुन विविध प्रश्नावर प्रकाशझोत टाकले आहे. वर्षभरापुर्वी त्यांचा विवाह झाला होता. 
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वञ हळहाळ व्यक्त केली जात आहे.
तुळजापूर लाईव्ह परिवारांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजली 
 
Top