नळदुर्ग,दि. २०: 

गुळहळ्ळी ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन ग्राम विकास पँनलचे सरपंचासह पाच सदस्याचा दणदणीत विजय झाला आहे.  तर ग्रामविकास पँनलला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

सरंपच तानाजी बनछरे , सदस्य कलिमा पटेल , सुभाष घोडके , कमलबाई क्षिरसागर , शशिकला पटणे , संगिता हलकंबे आदी विजयी झाले आहे.

ग्रामविकास पँनलचे यापुर्वीच  छायाबाई काळुंके हे बिनविरोध तर प्रेमनाथ निकम हे निवडुण आले. सरंपचपदासाठी दत्ता निकम हे अपक्ष म्हणुन निवडणुक लढवले.या निवडणुकीत  तानाजी बनछरे हे १११ मतानी सरपंचदी निवडुण आले. निवड झाल्याचे समजताच कार्यकर्ते व समर्थकानी जल्लोषा साजरा केला.

बहुजन ग्राम विकास पँनल प्रमुख आनंदाप्पा हाजगे , राम हलकंबे , शिवराम लांडगे , बालाजी पाटील शिवरुद्र हांजगे , महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक झाली.
 
Top