मुरुम,दि.२०

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेचे चेअरमन बापुराव पाटील व  महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रसचे उपाध्यक्ष  शरणजी पाटील  यांच्या  मार्गदर्शनाखाली उमरगा व लोहारा तालुक्यातील निवडणुका पार पडल्या  या  निवडणुकीत  नियोजनपुर्वक सर्व गावामध्ये सभा व रॅली घेवुन दोन्ही तालुक्यात कॉग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवुन दिले. 


उमरगा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने भरघोस यश संपादन केले असुन यापैकी तब्बल 11 ग्रामपंचायतमध्ये तर लोहारा तालुक्यातील 12 पैकी 3 ग्रामपंचयातवर कॉंग्रेसचे सरपंच निवडूण आलेले आहेत. उमरगा तालुक्यातील एकुण 23 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भुसणी, येणेगुर, आलुर, बेळंब, औराद धाकटीवाडी, मळगीवाडी, वरनाळ, महालिंगरायवाडी, कोराळ, एकुरगा या ग्रामपंचायतवर कॉंग्रेसने सत्ता संपादन केली आहे तसेच लोहारा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतपैकी सालेगांव, विलासपूर पांढरी व वडगांववाडी या ग्रामपंचायमध्ये कॉंग्रेसने यश मिळवले आहे. कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण असून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांचा मुरूम येथे सत्कार करण्यात आला.
 
Top