काटी, दि.२०: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बहुचर्चित काटी ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता उलथवून कॉंग्रेस पक्षाचा झेंडा रोवला.
या निवडणुकीत काँग्रेसचे बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर यांच्या पदवीधर असलेल्या पत्नी आशाताई हंगरगेकर या 56 मतांनी निवडून आल्या आहेत.निवडणूक निकालानंतर गुलालाची मुक्त उधळण,फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मागील पाच वर्षांत सुजित हंगरगेकर यांच्या आई सौ.शामलताई हंगरगेकर या उपसरपंच म्हणून पदावर होत्या.
मंगळवारी झालेल्या मतमोजणी दरम्यान येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांना जबरदस्त धक्का मतदारांनी दिला असून या निवडणुकीत त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.राजगौरी देशमुख यांचा पराभव झाला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप,कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाचे स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. कॉंग्रेसचे युवा नेते सुजित हंगरगेकर,कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी ग्रा.प. सदस्य करीम बेग,माजी सरपंच शामराव आगलावे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडी पॅनल निवडणूक रिंगणात उतरवून तरुण युवकांची फळी उभा करून मोठी ताकत लावली होती.
या निवडणुकीत काँग्रेसचे सौ. आशाताई सुजित हंगरगेकर, भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.राजगौरी विक्रमसिंह देशमुख व प्रसिद्ध उद्योजक माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख यांच्या पत्नी सौ. अश्विनी देशमुख यांच्यात अत्यंत अटीतटीची तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे 8 सदस्य तर भाजपचे 7 सदस्य निवडून आले.तर राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आपले खातेही उघडता आले नाही.
या निवडणुकीत काँग्रेसचे सरपंच पदासाठी पदवीधर असलेल्या सौ.आशाताई सुजित हंगरगेकर तर कॉंग्रेसमधून वार्ड क्रमांक दोन मधून अमोल महादेव गावडे, जुबेर हारुन शेख,सौ.उषाताई रामहरी लोंढे, वार्ड क्रमांक तीन मधून सौ.सविता सयाजीराव देशमुख, करीम (दादा) इस्माईल बेग,तर वार्ड क्रमांक पाच मधून सौ.शुभांगी चंद्रकांत काटे,भैरीनाथ बाबुशा काळे,प्रकाश रामचंद्र सोनवणे हे आठ निवडून आले आहेत. तर भाजपमधील वार्ड क्रमांक एक मधून अनिल सतिश बनसोडे, सौ. रेखा अनिल गुंड,बिस्मिल्ला मंजूर कुरेशी तर वार्ड क्रमांक तीन मधून ओबीसी प्रवर्गातून सौ.रंजना बाळासाहेब शिंदे व वार्ड क्रमांक चार मधून अरविंद ज्ञानदेव ढगे, सौ. आशा बाळासाहेब भाले व पुतळाबाई गोकुळ सोनवणे हे सात उमेदवार निवडून आले आहेत.
कॉंग्रेसच्या सर्व उमेदवार शिलेदारांचा अणदूर येथे राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण व जि.म.बॅंकेचे संचालक कॉंग्रेसचे युवा नेते सुनिल चव्हाण यांनी सत्कार करुन ग्रामपंचायत मध्ये चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच शामराव आगलावे, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर,नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य करीम बेग,प्रा. अभिमान हंगरकर,भैरी काळे, बाळासाहेब लोंढे, जुबेर शेख, अहमद पठाण, प्रकाश सोनवणे,जयाजी देशमुख, जाहेद इनामदार,रामदास देवकर, आकाश देवकर,सयाजी गायकवाड,संताजी गायकवाड, नितीन पांढरे,शहाबुद्दीन शेख,शुभम काटे,शाम गरड,दादा गाढवे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.