औरंगाबाद ,दि.०५

गायरान आणि इतर सर्व जमिनींच्या मालकीहक्क प्रश्नावर समविचारी संघटनांची बैठक  औरंगाबाद येथे संपन्न झाली.


उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यातील गायरान धारक व अतिक्रमण धारक या निर्णयाला विरोध करत आहेत.राज्यात जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने मोर्चा धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. काल औरंगाबाद येथे जमिन अधिकार आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विश्वनाथ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली गायरान जमिन हक्क प्रश्नावर बैठक  घेण्यात आली.यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील गायरान व इतर प्रश्नावर काम करणारे  प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वहिती असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांनच्या नावे करण्यात यावी असे ठराव या बैठकीत घेण्यात आले.


राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार व जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात येणार. २०१० पर्यत अतिक्रमण असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यात यावी. शासनाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वहिती करीत असलेल्या भुमिहिन कास्तकराच्या हक्काचा सातबारा व ८ अ चा उतारा करण्यात यावा . गायरान जमिनी हक्क परिषद घेण्यात येणार . यावेळी जमिन अधिकार आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडणकर यांनी राज्यात जिल्ह्यात जिथे गायरान जमिनी हक्क परिषद घेण्यात येईल तिथे उपस्थित राहून गायरान धारकांनाच्या बाजूने उभे राहणार असे सांगितले. 


स्वराज इंडिचे ललित बाबर यानी देखील गायरान जमिन धारकांचे पश्न घेऊन भव्य मोर्चा काढू व मुख्यमंत्री यांना भेटून सध्याची परिस्थिती मुख्यमंत्री यांना सांगू असे बोलले .भाई रमेश खंडागळे यांनी या गायरान जमिनी हक्क चळवळीला ताकद देऊ असे सांगितले. यावेळी सुभाष लोमटे,मनिषा तोकले ,प्रभा ..
अशोक तांगडे,दशरथ जाधव , अरविंद हमदापूरकर,कडूदास कांबळे ,अमर ताटे ,बायजाबाई घोडे, ओमप्रकाश गिरी आप्पाराव मोरताटे ,बाजीराव ढाकणे ,मनिषा घुले,विजय जाधव व महाराष्ट्रातील गायरान धारक उपस्थित होते.
 
Top