कळंब , दि. ०५: भिकाजी जाधव
आनावश्यक खर्चाला फाटा देवुन मतिमंद विद्यालयास धान्य,वसूतुची मदत  करुन वेगळ्या  पध्दतीने   विश्वनाथ  तोडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष तथा पर्याय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वनाथ  तोडकर यांचा 59 वा वाढदिवस सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावातील आधार मतिमंद निवासी वसतिगृहातील विध्यार्थी यांना खाऊ वाटप करून तसेच गहू, ज्वारी, किराणा साहित्य, 50 ताट, 50 चमचे, 50 ग्लास इत्यादी भांडी देऊन नुकतेच साजरा करण्यात आला.


 यावेळी आधार मतिमंद निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापक शुभांगी कलकेरी यांनी विश्वनाथ अण्णा तोडकर यांचा सपत्नीक सत्कार केला, यावेळी महाराष्ट्र लोकविकास मंच चे उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, विठ्ठल आबा तोडकर, अनिताताई तोडकर, सुलभा ताई तोडकर, विलास गोडगे, विकास कुदळे, सुनंदा खराटे, प्रसाद हिंगमिरे, धनश्री हिंगमिरे, हिराबाई तोडकर, साक्षी तोडकर, सिद्धांत तोडकर आदी उपस्थित होते.

आधार मागासवर्गीय महिला संस्था सोलापूर संचलित आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी, सोलापूर.जगदीश सिद्राम कलकेरी संस्थापक अध्यक्ष,  मुख्याध्यापिका सौ. शुभांगी जगदीश कलकेरी , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम कलकेरी,  कोमलिका कलकेरी, व्यंकटेश शिंदे, शुभदा कलकेरी, सृष्टी शिंदे, सोनाली शिंदे, राम शिंदे, अंबू गड्डी, मंजुषा हिबारे आदिसह विद्यार्थी , कर्मचारी उपस्थित होते.
 
Top