काटी, दि. ०६: उमाजी गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील विद्या संकूलमधील 17 वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांनी योगा स्पर्धेत सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन करीत यशाची परंपरा कायम राखली. 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री रविशंकर विद्यालयात भरविण्यात आलेल्या तालुका स्तरीय योगा स्पर्धेत हे यश संपादन केले. 

अणदूर येथे पार पडलेल्या 17 वर्ष वयोगटातील योगा स्पर्धेत यमगरवाडी विद्या संकूलमधील विद्यार्थ्यींनी कु.शितल ठाकूर, साक्षी गायकवाड,सोनाली गिरी, पायल साळुंके यांनी तर विद्यार्थ्यांमधून रोहन माने,समीर जाधव या विद्यार्थ्यांनी विजय मिळविल्याने त्यांची  जिल्ह्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू,उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक आयचित, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे,अण्णासाहेब कोल्हटकर,बालाजी क्षीरसागर, महादेव शेंडगे,माऊली भुतेकर यांच्यासह शाळेचे शिक्षक वृंद सर्व कर्मचारीवर्ग यांनी कौतुक व अभिनंदन केले.
 
Top