काटी/उमाजी गायकवाड
समाजामध्ये ज्ञान , विज्ञान , आणि सुसंस्काराची पेरणी करीत आदर्श शिक्षकांची उपजत संस्कृती जोपासणारे गुरुवर्य विश्वनाथ गायकवाड यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ . श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले .
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी ) येथे मराठवाडा समन्वय समिती , पुणे व गायकवाड परिवार यांच्या वतीने आयोजित गुरुवर्य विश्वनाथ दगडोबा गायकवाड यांचा अमृत महोत्सवी गौरव समारंभ व गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्षीय पदावरुन ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे - पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे लिगल सेलचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण राणे, निवृत्त प्राचार्य डॉ.रमेश दापके, माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद डोंगरे,महेंद्र धुरगुडे, व्ही.डी.गायकवाड यांच्या जीवनावर आधारित 'ऋषितुल्य ' गौरव ग्रंथाचे संपादक संदिपान पवार, प्रा.अभिमान हंगरगेकर, नितीन बागल,शिवसेना उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवडचे नेताजी काशीद,कवी दास पाटील , दत्ताभाऊ अर्जुन, शंकर पवार, किसन डफळे,संयोजक ॲड. सुभाष गायकवाड आदींची उपस्थिती होती .
यावेळी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन ७५ व्या अमृत महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने विश्वनाथ गायकवाड यांचा प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला . याशिवाय मान्यवरांच्या हस्ते "कृषीतुल्य" गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले . यावेळीआदर्श व्यवसायिक पुरस्कार युवराज तुकाराम बागल ,औदुंबर बागल , सतीश बागल , किशोर जाधव तर आदर्श शेतकरी पुरस्कार गुंडेराव पवार ,शरद पवार , हनुमंत गायकवाड यांना व आदर्श माता पुरस्कार कल्पना राजेंद्र बागल , आशा गणपत बागल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात अॅड. लक्ष्मण राणे , संदीपान पवार ,मुकुंद डोंगरे , राजकुमार धुरगुडे ,प्राचार्य रमेश दापके, गौरव मूर्ती गायकवाड आदींची भाषणे झाली . संदिपान पवार यांनी गौरव ग्रंथ प्रकाशन भूमिका विशद केली . प्रास्ताविक अॅड.सुभाष गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले .आभार प्रदर्शन विलास गायकवाड यांनी केले .या कार्यक्रमास शैक्षणिक ,सामाजिक साहित्य व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .