काटी/उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले रणजित (दादा) वडणे यांना एलआयसीतील जागतिक स्तरावर विमा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा 2023 चा एमडीआरटी हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी असलेले रणजीत (दादा) वडणे यांनी 2022 मध्ये एलआयसीमध्ये कमी कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विमा कंपनीतील मानाचा समजला जाणारा "एमडीआरटी" हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक स्तरावरील या पुरस्कारामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रणजित वडणे यांना विकास अधिकारी प्रशांत बोठे यांचे मार्गदर्शन लाभले. वडणे यांनी आजपर्यंत 1500 पेक्षा अधिक कुटुंबांना विमा संरक्षित केले आहे. कुटुंबाचे योग्य अर्थिक नियोजन म्हणजे निवृत्तीकरिता पेन्शन योजना, मुला-मुलींसाठी शिक्षण व विवाहासाठीच्या पैशाचे नियोजन योग्यरीत्या करुन देण्याचे कार्य केले.
रणजीत (दादा)वडणे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माळुंब्रासह परिसरातून सर्वत्र कौतूक होत आहे.