मंगरूळ , दि. १४ :
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सृष्टी युवा फाउंडेशन तर्फे संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची दखल घेऊन पाच संस्थांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये वात्सल्य संस्थेस उत्कृष्ट सामाजिक संस्था हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वात्सल्य सामाजिक संस्था ही एकल महिला,वृक्ष लागवड व संगोपन,गोशाळा,अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व,आरोग्य आदी विषयात काम करते.यापूर्वी संस्थेच्या सामाजिक क्षेत्रातील कामास प्रिसिजन फाउंडेशन सह इतर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
याप्रसंगी प्राचार्या मृणालिनी अनारसे,उपायुक्त श्री.विकास शेवाळे,मोरडे ग्रुपचे श्री.काकासाहेब मोरे,सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.राजेश भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत वात्सल्य संस्थेचे पदाधिकारी श्री.शंकर जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील पत्रकार भवन मधील एस.एम.जोशी सभागृहात सदरील कार्यक्रम पार पडला.यावेळी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.