नळदुर्ग, दि.१२ :
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथिल भुईकोट किल्ल्यात ‘नळदुर्ग पर्यटन महोत्सव' साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने येथील नगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी रोजी बैठक संपन्न झाली.
नळदुर्ग पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नळदुर्ग पर्यटन महोत्सवासाठी सुचना, संकल्पना, कोणते सांस्कृतिक वा इतर कार्यक्रम घेता येतील. याबाबत सामान्य नागरिक, कलाकार, लोकप्रतिनिधी यांच्या कल्पनाबाबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी छञपती शिवाजी महाराजांच्या जयंती दरम्यान भुईकोट किल्ल्यात महोत्सव घेण्याची योजना असून प्रशासन व लोकसहभाग यातून चांगले नियोजन करण्याच्या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आनेकांनी विविध सुचना, संकल्पना मांडल्या. बैठकीस सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगरसेवक संजय बताले , शहबाज काझी, मुश्ताक कुरेशी, शफी शेख, कमलाकर चव्हाण, विनायक अहंकारी , किशोर बनसोडे, संतोष पुदाले, धिमाजी घुगे, सुशांत भुमकर, सरदारसिंग ठाकूर, कल्पना गायकवाड, मारुती बनसोडे , पञकार सुहास येडगे , तानाजी जाधव , विलास येडगे , दादासाहेब बनसोडे, भगवंत सुरवसे , आदि उपस्थित होते.