नळदुर्ग , दि. १५ : 

  समाजाच शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा नष्ट करणे,भारतीय संविधानाचा आशय समाजात रुजविणे व वैज्ञानिक दृष्ट्या समाज विवेकी बनविण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू करण्यात आली आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष प्रा.महादेव बावगे (लातूर) यांनी नळदुर्ग  येथे कार्यकर्त्यांसी  बोलताना केले.
 

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाखांचे नुतनीकरण करणे नवीन कार्यकर्ते जोडणे व अनिसची चळवळ मजबूत करणे या उद्देशाने प्रा.महादेव बावगे हे सतत महाराष्ट्रभर फिरत असतात त्याचाच भाग म्हणून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी आले असता कार्यकर्त्यासी बोलत होते.
 

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, भैरवनाथ कानडे, एस.के.गायकवाड, प्रा.भास्कर वाघमारे, महेश कदम,सुनील जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top