नळदुर्ग , दि. १४:
राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद प्रतिष्ठान नळदुर्ग यांच्या वतीने सलग पाचव्या वर्षी गुरूवार रोजी मल्लिकार्जून मंदिर सभागृहात आयोजित रक्तदान शिबीरात ११४ जणांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीराच्या सुरूवातीस राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून आभिवादन करण्यात आहे. कार्यक्रमास शिवाजीराव मोरे, आयोजक तथा जय हिंद प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय बताले, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नय्यर जहागीरदार, शहबाज काझी, शफी शेख, रमेश पिस्के, समीर मोरे, कमलाकर चव्हाण, सुशांत भुमकर, विनायक अहंकारी, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार उपस्थित होते. सोलापूर येथिल अश्विनी रूग्णालयाच्या पथकाने रक्तसंकलन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाले, राजेंद्र तोग्गे, मल्लिनाथ लामजणे, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र काळे, युवराज साखरे, अँड. आनंद बताले, विजय डूकरे, असद इनामदार, संगमेश्वर व्हनाळे, शुभम हजारे, यांनी परिश्रम घेतले.