काटी, दि. १४: उमाजी गायकवाड
अफार्म पुणे ,फिक्की आणि तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथील जय हनुमान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाणेवाडी येथे गुरुवार दि. 12 रोजी हवामानानुकूल-अल्पखर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसार अभियानांतर्गत शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गाढवे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी सहाय्यक मनोज माळी हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव पंडीत बामणकर यांनी कार्यक्रमाविषयी पार्श्वभूमी, संकल्पना व गरज व महत्त्व या विषयी माहिती दिली.
त्यानंतर साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले मनोज माळी यांनी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम सांगून त्यावर मात करण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावे व येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यानी संघटीतपणे लढा देण्याची गरज विषद केली. शेंद्रीय शेती व रासायनिक शेतीची सांगड घालून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यावर भर दिला पाहिजे असे सांगून हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम ,गांडूळ खत कसे तयार करावे याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. तर अध्यक्षीय समारोप करताना ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गाढवे यांनी ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांना जे जे सहकार्य करता येईल ते करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर जाधव यांनी तर आभार संस्थेचे सचिव पंडीत बामणकर यांनी मानले.
यावेळी संस्थेचे सचिव पंडीत बामणकर,कृषी सहाय्यक मनोज माळी, प्रभाकर जाधव,सोमनाथ गाढवे, अण्णा आडसुळ,रघुनाथ वाडकर,मोहन मिरजे,गोरक सुर्वे, समाधान शिनगारे,संतोष लोके, वंसत साठे,मनोहर वडवे आदींसह अल्पभूधारक शेतकरी उपस्थित होते.