वागदरी, दि. १७: एस.के.गायकवाड
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून वागदरी ता.तुळजापूर येथे कार्यरत असलेल्या मदनराजे पाटील मित्रमंडळ वागदरीची नुतन कार्यकारिणी जाहीर करून सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी यांच्या हस्ते मदनराजे मित्रमंडळाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
प्रारंभी माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, ह.भ.प.सुरेशसिंग परिहार, शिवभक्तीतून व्यसन मुक्ती करणारे श्रीशैल्य सुरेश महाराज, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवाजी मिटकर गुरुजी यांच्या हस्ते फित कापून मित्रमंडळाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी निवडण्यात आलेली मदनराजे मित्रमंडळाची नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष तात्याराव चव्हाण, उपाध्यक्ष मधुकर चव्हाण, सचिव हणूमंत जाधव,सहसचिव महादेव धुमाळ,संघटक भिमराव बिराजदार,सहसंघटक अजय गायकवाड (पाटील)आदीची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यांनी केले.
याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते आनंदाभाऊ धुमाळ,भालचंद्र यादव, मंडळाचे मुख्यप्रवर्तक मदनराजे पाटील,आप्पासाहेब मिटकर,प्रमोद सोमवसे,उत्तम झेंडारे,शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,ग्रा.प.सदस्य अंकुल वाघमारे,दिपक धुमाळ सह मंडळाचे सर्व सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.