नळदुर्ग ,दि. १७ :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी ता. तुळजापूर येथे बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
त्यामध्ये गावातील पालकांनी ज्येष्ठ व्यक्तीने या सर्व वस्तूंचा आस्वाद घेत तुफान आशा गर्दीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खरेदी करत असताना पहावयास मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान ,वस्तूंची देवाणघेवाण , अनेक वस्तूंची खरेदी विक्री अशा अनेक नवनवीन बाबी विद्यार्थ्यास पहावयास मिळाल्या. प्रत्यक्षरुपाने बाजाराचे स्वरूप यावेळी पाहायला मिळाले.
आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक बंधू भगिनी महाविद्यालयीन मुले मुली यावेळी उपस्थित होते .यावेळी बाल आनंद मेळाव्यातून एकूण बारा हजार रुपयांची कमाई केली. अगदी छोट्याशा गावातून अगदी पटसंख्या कमी असलेल्या शाळेतून आपल्या विद्यार्थ्यानान पालकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला.
यावेळी शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष श्री शरद भोसले, उपाध्यक्ष सौ शुभांगी सुरवसे, आशाताई गुंजकर ,श्री संदिपान गुंजकर ,गोटू कदम ,पवन गायकवाड ,साधना भोसले ,रेखा पवार , सारिका आडे , वंदना चव्हाण भामलाबाई राठोड. सुपरवायझर जाधव टीपी, श्री साळुंखे ,दिपाली सुरवसे यांनी आपल्या या बाल आनंद मेळाव्या विषयी आपले सुंदर असे मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक विक्रम पाचंगे ,शिक्षक श्री रामकृष्ण मोहिते ,श्री रमेश दूधभाते, श्रीमती सुचिता चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विक्री करण्यासाठी मार्गदर्शन केले.