उमरगा,दि. १८: लक्ष्मण पवार
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात 5 वे विद्यार्थी साहित्य संमेलन बुधवार दि.18 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर 42 वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा बाल साहित्यिक डॉ. शेषराव मोहीते, संम्मेलनाध्यक्ष कु. वेदांत संतोष पाटील, मुख्याध्यापक महेश हारके, बी. ए. बिराजदार,सरपंच सौ. रेखा गुंजोटे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, डॉ. बालाजी इंगळे, राजेंद्र कानडे, रमेश मंमाळे, रोटरी क्लब चे अध्यक्ष अजित गोबारे, बसवराज बिराजदार, सौ. रेखा सुर्यवंशी, कमलाकर भोसले,प्रविण स्वामी यांची उपस्थिती होती. हे संमेलन तालुका गट शिक्षण कार्यालय, रोटरी क्लब व अभिजात साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नव युवा कवी गायञी सपळे, वैभवी वडदरे, शिवलीला बिराजदार यांनी पुस्तक, पाऊस, आई बाबा ही कविता सादर केले.
त्यानंतर कु. प्राची पवार हीने आई सावित्रीबाई ही कविता सादर....
आई सावित्री शिकली
घेतला वसा शिक्षणाचा
अख्या जगाणे मानली
आई सावित्री शिकली /
शेन मातीचे गोळ
तिच्या हातामध्ये बळ
अहो उचललं पाऊल
शिक्षण बिज रोवली
आई सावित्री शिकली
साथ दिली जोतिबांनी
जाणीव केली स्ञीमणी
आई सावित्री शिकली //
स्वत झेलून अन्याय
स्त्री जिवन केले धन्य
अन् घडवून समाज मन
केली शाळा स्थापन
अहो देऊन प्रकाश
ठेवला नवा आदर्श
स्त्री मन जिंकली
आई सावित्री शिकली ///
या कवितेने उपस्थित सर्वांना आकर्षीत करून टाळ्यांचा गडगडाट झाला. तद्नंतर समृद्धी फडताळे, भक्ती पवार, शुभांगी कांबळे, आदित्य थिटे, सानवी मारकड, प्रणाली स्वामी, प्रसाद कुंभार, पल्लवी पोतदार, तेजस डिग्गिकर, समीक्षा फुगटे, तनिष्का झांबरे, दर्शना राठोड, नम्रता सुरवसे, साक्षी बोळशेट्टे, संध्या गायकवाड, प्रथमेश ख्याडे, नम्रता गवाले, मधूरा गायकवाड, स्वरूपा जगदाळे, अस्मिता रणखांब, ऋतुजा येलनुरे, प्रतिक्षा गायकवाड इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कविता सादर केले आहेत.
शेवटी कथा सादरीकरण झालेवर कार्यक्रमाचे समारोप झाला.
शाळेत उत्तम नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन कवी पुष्पलता पांढरे, प्रास्ताविक कवी बालाजी इंगळे तर मान्यवरांचे आभार दिपाली भोसले यांनी मानले.