वागदरी, दि. २०: एस.के.गायकवाड :


ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणून कसलाही न्यूनगंड न बाळगता निश्चित ध्येय ठरवून आहे त्या परिस्थितीचा सामना करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जावे असे अवाहन राज्य गुप्तवार्ता विभाग उस्मानाबादचे मुख्य गुप्तवार्ता आधिकारी रवींद्र कराड यांनी वागदरी ता.तुळजापूर येते आयोजित राष्ट्रीय सेवायोजना शिबिरात बोलताना केले.
  

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग च्या वतीने वागदरी येथे दि.१८ ते २४ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित सात दिवशीय राष्ट्रीय सेवायोजना शिबिराच्या दुसऱ्या दिवशी "स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना"या विषयावर आयोजित बौद्धिक व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हनून रवींद्र कराड बोलत होते.
    

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बालाजी बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय सावंत, डॉ. यु.एन. भाले, प्रा.बी.डी.गायकवाड आदी होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.गजानन चिंचवाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन देवद्वारे यांनी केले.
 
याप्रसंगी सरपंच तेजाबाई मिटकर,डॉ. लक्ष्मण थिट्टे,प्रा.एस.पी.कठारे,प्रा.बी.एन.क्षिरसागर, डॉ.निलेश शेरे,डॉ. सुभाष राठोड, डॉ. अशोक कांबळे, प्रा.हानुमान पाटील सह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top