उमरगा, दि. १९ :
उमरगा तालुक्यातील नारंगवाडीची वाडी येथे गुरुवारी (ता. १९) रोजी श्री. शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालयच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस पाटील हेंमतराव पाटील होते. उद्घाटक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड होते. यावेळी नाईचाकूरचे प्राचार्य व्ही. एम. जाधव, नारंगवाडीचे प्राचार्य डॉ. आर. बी.गव्हाणे. डॉ. एन. के. कांबळे, पत्रकार विठ्ठल चिकुंद्रे, लखन जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. श्रीकांत गायकवाड म्हणाले की, आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत, जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो. तो स्वतःसाठी सुद्धा एकनिष्ठ राहत नाही.समाजाला दिशा देणारा माणुसच समाजाला काहीतरी देऊन शकतो. समाजाभिमुख असे आजच्या युवकांचे ध्येय असले पाहिजे. तरुणांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. मनाने जिंकलेला माणुसच यशस्वी होऊ शकतो. जो मनाने हारलेला असतो तो पराभूत होत असतो. आपली निष्ठा आसावी तर संत चोखामेळा सारखीच. विद्यार्थ्यांनी सध्या विविध कौशल्य अंगी जोपासून आत्मविश्वासाने परिश्रम घेतल्यास तुम्ही कोणत्याही यशाच्या शिकराला गवसणी घालू शकाल. आज अनेक जण भौतिक सुखाच्या मागे लागले आहेत. खरे तर स्वतःबरोबरच समाजाची प्रगती झाली पाहिजे.आर्थिक विषमतेची दरी ही समाजासाठी घातक आहे. श्रीमंतांनी समाजाकडे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून बघीतले पाहिजे. व्यक्तीवादी मनोवृत्ती आज समाजात दिवसेंदिवस वाढ चालली आहे. प्रत्येकाने जीवन जगत असताना समाजाचा विचार करणे गरजेचे आहे. आज स्वार्थी भावना वाढु लागली आहे, असे सखोल मार्गदर्शन प्राचार्य श्रीकांत गायकवाड यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले की, गुरुने चांगुलपणाचे आपले ज्ञानरूपी दान मोठ्या मनाने शिष्याला दिले पाहिजे. संस्काराशिवाय या जगात दुसरे काहीच नाही. मोठे झाल्यावर समाजाचे ऋण कसे फेडता येईल याकडे लक्ष द्या. माणसाची सोबत चुकली दुर्गुणाची संगत लाभली की, माणुस संपतो. वेळेचा पुरेपुर व सुयोग्य फायदा घेता आला पाहिजे. एकदा गेलेली वेळ परत मिळविता येत नाही. क्रांतिकारी विचार हे युवकच करु शकतात. हा इतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे. आपला देश युवकांचा आहे. स्वामी विवेकानंदांचा आहे. जो काहीतरी वेगळे समाज उपयोगी करतो त्यालाच समाज मानसन्मान देतो. आत्मविश्वास व सकारात्मक भूमिकेतून केलेले कोणतेही कार्य समाधान देते. सध्या अतिरेकी मोबाईलच्या वापरामुळे माणुस विकलांग होण्याच्या मार्गावर असून मोबाईलचा अतिरेकी वापर हे देखील मोठे आव्हानच आजच्या तरुणांसमोर आहे. " स्वप्न असी बघा की ज्यामुळे आकाशात उडण्याचे बळ येईल."
माणुस असे बना की माणुसकी सुद्धा नतमस्तक होईल, शिष्य असे बना की जग सुद्धा नतमस्तक होईल. असे सविस्तर मार्गदर्शन प्रा. डॉ. महेश मोटे यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. पी. एम. शिंदे, एस. व्ही. पाटील, सागर वनकुंद्रे, महेश बाबळसुरे आदींसह स्वंसेवक, ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. एम. जाधव यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. व्ही. टी. टाळकुटे तर आभार डॉ. आर. बी. गव्हाणे यांनी मानले.