काटी, दि. ०९: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात घेण्यात आलेल्या पाच दिवसीय शिबीराचा शनिवारी सकाळी समारोप झाला.
या आनंद अनुभूती शिबिराच्या दरम्यान प्रशिक्षक संतोष सावंत बीड, व भास्कर भैय्या मगर, सेलू जि.परभणी यांनी ज्ञानासोबत योग, प्राणायाम,सुदर्शन क्रिया, सामुहिक ध्यान साधना केल्याने तणावापासून मुक्ती, शरीर स्वास्थ्य, प्रसन्नता,मनाची शांतता, एकाग्रता, उत्साहासोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने विविध रोगांपासून मुक्ती मिळत असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण सुदर्शन क्रिया नियमित करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रशिक्षणार्थीच्या वतीने प्रशिक्षक संतोष सावंत, भास्कर मगर,शशि कदम यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
शेवटी उद्योजक अमरसिंह देशमुख यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटपाने शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी 40 प्रशिक्षणार्थीं महिला, पुरुष उपस्थित होते.